अभिनेता मुकेश खन्ना यांच्या एकुलत्या एक बहिणीचे निधन; सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांच्या एकुलत्या एक मोठ्या बहिणीचे कोरोनामुळे निधन झाले आहे. याबाबतची माहिती खुद्द मुकेश खन्ना यांनीच दिली आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी एक भावुक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. काल मी कित्येक तास माझ्या मृत्यूच्या खोट्या बातमीचे सत्य सांगण्यासाठी धडपड करत होतो. मात्र एक भयंकर सत्य माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे, याचा मला अंदाजही नव्हता.. अश्या शब्दात त्यांनी आपल्या भावना या पोस्ट मध्ये व्यक्त केल्या आहेत. मुकेश खन्ना यांची बहीण कमल कपूर यांना शेवटपर्यंत आयसीयू बेड मिळाला नाही आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

https://www.instagram.com/p/COxtrRoJSVI/?utm_source=ig_web_copy_link

मुकेश खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बहिणीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच त्यांनी अत्यंत भावुक पोस्टसुद्धा लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘काल मी कित्येक तास माझ्या मृत्यूचे सत्य सांगण्यासाठी धडपड करत होतो. मात्र मला अजिबात अंदाज नव्हता की, एक भयंकर सत्य माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे. आज माझ्या एकुलत्या एक मोठ्या बहिणीचे दिल्लीमध्ये निधन झाले. तिच्या निधनामुळे मी पुरता हादरून गेलोय. माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. १२ दिवस तिने कोरोनाशी लढा दिला होता. मात्र लन्ग्स कन्जेक्शनमुळे आम्ही तिला कायमचे गमावून बसलो. समजत नाही देव कोणता हिशोब चुकता करतोय? आज मी पहिल्यांदा आयुष्यात हादरलो आहे,’.

https://www.instagram.com/p/COvRL8DpkYp/?utm_source=ig_web_copy_link

एका वेब पोर्टलला मुलाखत देताना त्यांनी बहिणीच्या निधनाबद्दल सांगितले. दरम्यान ते म्हणाले, माझ्या बहिणीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तिने कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र तरीसुद्धा तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे आम्ही तिच्यासाठी आयसीयू बेडच्या शोधात होतो. मात्र शेवटपर्यंत तिला बेड नाही मिळाला आणि तिने आज अखेरचा श्वास घेतला. बहिणीचे अंत्यदर्शनही मी घेऊ शकलो नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांच्या निधनाची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र खुद्द मुकेश खन्ना यांनी मी जिवंत आहे, ठणठणीत आहे असे सांगत त्यांच्या निधनाच्या वृत्ताचे खंडन केले होते.

Leave a Comment