हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतर गृहविभागाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र तत्कालीन मुख्यमंत्री अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई याना फोन करून शिंदेंना सुरक्षा देऊ नका असे आदेश दिले असा मोठा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला. याबाबतशंभूराज देसाई याना विचारले असता त्यांनी या आरोपांना दुजोरा दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री असताना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला माओवाद्यांनी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर सखोल चौकशी केल्यांनतर पत्राबाबत तत्थ्य आढळलं. या सर्व घडामोडींवर विधानभवनाच्या दोन्ही सभागृहातही सत्ताधारी आणि विरोधकांची चर्चा झाल्यांनतर शिंदे आणि यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात येईल असं मी गृहराज्य मंत्री या नात्याने विधानपरिषदेत जाहीर केलं होत.
यानंतर मी राज्याचे पोलीस महासंहालक, गुप्तचर यंत्रणा, SID कमिशनर, ADG या सर्वांची बैठक मी बोलावली होती. या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना त्याच दिवशी सकाळी ८ च्या सुमारास वर्षा निवासस्थानावरून फोन आला आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की, एकनाथ शिंदे यांची सुरक्षा तुम्हाला वाढवता येणार नाही असं म्हणत सुहास कांदे यांच्या आरोपांना दुजोरा दिला.