अन् गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी घातली पत्नीसह फुगडी

0
558
Shambhuraj Desai Smitadevi Desai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पाटण तालुक्‍यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य दिव्य दिंडीसमोर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पत्नी स्मितादेवी देसाई यांच्यासह फुगडी घातली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे.

गत बारा वर्षापासून सुरु असलेल्या श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे तेरावे वर्ष होते. या पारायण सोहळयामध्ये 530 वाचक सहभागी झाले होते. तसेच तालुक्‍या बाहेरीलही भाविक भक्त या सोहळयामध्ये मोठया संख्येने सहभागी होते.

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी घातली पत्नीसह फुगडी ;सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

यावेळी काढण्यात आलेल्या भव्य दिव्य दिंडीसमोर मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पत्नी स्मितादेवी देसाई यांच्याबरोबर फुगडी घातली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या या हटके अंदाजाचे चांगलेच कौतुक केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या सोहळ्यास राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह श्रीमती विजयादेवी देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, यशराज देसाई, ईश्वरी देसाई, चि.जयराज देसाई, चि.आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here