मंत्री शंभूराज देसाईंचा डॉ. पाटणकरांना फोन; कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाबाबत म्हणाले…

Shambhuraj Desai Dr. Bharat Patankar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे गेल्या काही दिवसांपासून पुनर्वसनाच्या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा विषय स्थानिक आमदारांकडून मार्गी लावला जात नसल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिल्यानंतर आज राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांना फोन केला.

मंत्री शंभूराज देसाई यांनी डॉ. पाटणकर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. यावेळी मंत्री देसाई यांनी प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाविषयी सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे.

सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या पुनर्वसनाच्या कामी किती निधीची आवश्यकता आहे. तसेच या करिता काय करता येईल याची माहिती घेण्याचे आदेश समितीच्या सदस्यांना देण्यात आले आहेत. अधिवेशनानंतर तात्काळ बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.