गृहराज्यमंत्र्यांची पुष्पा स्टाईल : झुकेगा नही साला…यात्रेत डान्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे उत्तम संसद पट्टूसह एक सर्वसामान्य जनतेशी नाळ ठेवणारे नेते आहेत. त्यांचा बिंधास्तपणाही अनेकदा पहायला मिळतो. नुकताच त्यांचा मरळी येथील ग्रामदेवतेच्या यात्रेत पालखी समोर पुष्पा या हिंदी चित्रपटाच्या एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी पुष्पा स्टाईलने झुकेगा नही साला, असे म्हणत डान्स केला आहे.

पाटण तालुक्यातील मरळी गावची निनाईदेवी या ग्रामदेवतेची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी गावच्या यात्रेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थिती लावली. यावेळी गावातील त्यांच्या घरासमोर पालखी येताच शंभुराज देसाईंनी सहकुटुंब ग्रामदेवता निनाईदेवीचे दर्शन घेतले. तसेच गुलालाची उधळण केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत पालखीसमोर जाऊन देसाई यांनी गाण्यावर ठेका धरला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/270118601999570

 

गृहराज्यमंत्री घरासमोर पालखी आल्याचे पाहताच ग्रामस्थांनीही गृहराज्यमंत्री देसाई यांना उचलून डोक्यावर घेतले. तसेच त्यांच्यासोबत गाण्यावर ठेका धरला. यावेळी ग्रामस्थ तसेच गावातील तरुणांनाही गृहराज्यमंत्री देसाई यांच्यासोबत डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही.