कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यात शिंदे गटाने पहिली ग्रामपंचायत निवडणूक सत्तांतर घडवत जिंकली आहे. आ. शंभूराजे देसाई यांच्या मतदारसंघातील कराड तालुक्यातील उत्तर तांबवे या ग्रामपंचायतीत तब्बल 22 वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवत शिंदे गटाने पहिला एक विजय मिळवला आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान व शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात हा विजय मिळाला आहे. उत्तर तांबवे येथे सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल आणि जय हनुमान ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली. युवा उद्योजक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्राम विकास पॅनेलने 4-3 असे सत्तांतर करत विजय मिळवला. उत्तर तांबवे येथील ग्रामपंचायत सत्ताधारी पाटणकर गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर आमदार शंभूराजे देसाई व रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील यांच्या गटाने 4 जागा मिळवत सत्तांतर घडवले.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे – सर्व साधारण गट- विजयी -रोहित चव्हाण 98), पराभूत- सागर चव्हाण (89), विजयी -जयसिंग पाटील (120), पराभूत- प्रकाश पाटील (84), विजयी – शशिकांत चव्हाण (103), पराभूत -अजय पवार (57), अनुसूचित जाती स्त्री राखीव – विजयी- विद्या साठे (94), पराभूत -अश्विनी कारंडे (92), सर्वसाधारण स्त्री गट -विजयी – रूपाली पवार (116), पराभूत – जयश्री पवार (93), विजयी-बानुबी मुल्ला (107), पराभूत- बेबी मुल्ला (97) विजयी – भारती चव्हाण (102), पराभूत – वनिता चव्हाण (58)