सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
काल झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले असून टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नये. त्यामुळे कोणी कोणाच काय चोरले असे बोलणे उद्धव ठाकरेंच्या मुखातून शोभत नाही, असे देसाई म्हणाले.
शंभूराज देसाई यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या मुखामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य आश्चर्य कारक आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे कौटुंबिक वारसदार आहेत परंतु करोडो हिंदू बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेम करतात. त्या प्रत्येकाचा अधिकार बाळासाहेब ठाकरेंच्यावर आहे.
अरविंद सावंत यांना तीन वर्षे का लागली? : देसाई यांचा सवाल
रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का ? असं शरद पवार म्हणाले पवारांच्या विधानानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हायचं ठरवलं असा मोठा गौप्यस्फोट अरविंद सावंतांचा शिवगर्जना सभेत केला. याबाबत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, त्यावेळी तुमच्याबरोबर असणाऱ्या 56 पैकी 40 आमदारांचे मत होतं की महाविकास आघाडी करू नका पक्षप्रमुख म्हणून तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला त्यावेळी उद्धव ठाकरे आमच्यासारख्या सामान्यांकडे बोट दाखवून म्हणत होते की सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करीन तेच आमदारांकडे दाखवलेले बोट मुख्यमंत्री होताना मात्र स्वतःकडे आलो आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. आता बोलण्यापेक्षा त्याचवेळी आमच्यासारख्यांना सांगायला हवं होतं बैठक घेऊन शरद पवार हे मला मुख्यमंत्री होण्यास सांगत आहेत. तुम्ही आता या गोष्टी सांगत आहात त्यामुळे यात किती तथ्य आहे हे लोकांनीच ओळखावे, असे देसाई म्हणाले.
चोरलं म्हणणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही, कारण…; शंभूराज देसाईंची घणाघाती टीका pic.twitter.com/ib4KazJ8cJ
— santosh gurav (@santosh29590931) April 3, 2023
संजय राऊत यांना टिव्हीवर दाखवन कमी करा : देसाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणिक डिग्री बाबत संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना टिव्हीवर दाखवायचं कमी करा. तुम्ही पत्रकार मंडळींनी स्वतः सर्वे करा संजय राऊत बोलायला लागल्यावर लोक चॅनल बदलतात त्यांना लोक आता कंटाळली आहेत. मी स्वतः च एक सर्वे करतो असे सांगून संजय राऊत यांना तुम्ही टिव्हीवर दाखवन बंद करा, अशी विनंती देखील देसाईंनी केली.