हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात बहीण प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच समोर येत होतं. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच आहे असं म्हणत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडे यांना थेट ऑफर दिली आहे. ते बीड येथे बोलत होते.
पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. तसेच त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून केला जाईल, असेही शंभुराज देसाई म्हणाले.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हंटल की आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू मी कुणालाही भीत नाही. आपलं घर का सोडायचं? असा सवालाच पंकजा मुंडेंनी उपस्थितीत केला होता.