पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
पाटण मतदार संघातील पाणंद रस्त्यांची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. ती मार्गी लागण्याकरीता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रयत्न केले. त्यानंतर यातून 22 गावातील सुमारे 27 किमी लांबीच्या कामांना 2021- 22 वर्षाच्या वार्षिक आराखडयात समावेश करत मंजुरी देण्यात आली. शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते, योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे मंत्री देसाई यांनी शिफारस केली होती.
पाटण तालुक्यातील पाटण मतदार संघातील अनेक दुर्गम अशा भागातील गावात मंदिर तसेच पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती. यामध्ये पत्रेवाडी चोपडी पोहोच रस्ता, काळगाव येथे येळेवाडी फाटा ते धामणी पाणंद रस्ता, पापर्डे खुर्द पाणंद रस्ता, शिद्रुकवाडी धावडे येथील पाणंद रस्ता, जिमनवाडी कुशी जळकेवस्ती पाणंद रस्ती, विहे विहिर पाणंद रस्ता, येराड ते तामकडे पाणंद रस्ता, आवर्डे धनगरवस्ती पाणंद रस्ता, चाफळ ते गमेवाडी पाणंद रस्ता, गुढे ते भोसगाव पाणंद रस्ता, डावरी येथील पाणवटा ते निनाई मंदिर पाणंद रस्ता, आडूळ पेठ ते काळेवाडी पाणंद रस्ता, मारुल हवेली येथील जाधव शिवार ते गांधीटेकडी कारखाना पाणंद रस्ता त्याचा समावेश आहे.
तसेच वेताळवाडी गावठाण ते खारुती पाणंद रस्ता, गारवडे नवनाथ बंगला ते मारुल वडा पाणंद रस्ता, आंब्रुळे ढोपरेवस्ती ते मळी पाणंद रस्ता, मरळी निनाई मंदिर ते नंदा पाणंद रस्ता, मरळी दत्त खुटाळ पाणंद रस्ता, सांगवड सोसायटी गोडावून ते गडकर पाणंद रस्ता, नाडे ते पिलके अरदळ पाणंद रस्ता, बांबवडे ते तळी पाणंद रस्ता, साकुर्डीवस्ती येथील पाणंद रस्ता या कामांचा वार्षिक आराखडयात समावेश करण्यात आलेला आहे. त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे.