अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच; आम्हाला काहीच अधिकार नव्हते – शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही फक्त नावालाच राज्यमंत्री होतो, आम्हाला काहीच अधिकार नव्हते. येवडच नव्हे तर अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री-राज्यमंत्री अधिकार वाटप देखील झाले नाही. राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता असा दावा करत बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली आहे. तसेच आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्वाचा ज्वलंत विचार आम्ही सोडलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले

एकीकडे आम्हाला निधी मिळत नव्हता तर दुसरीकडे ठिकाणी आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. आम्ही याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सातत्याने तक्रार केली तर मात्र यासंदर्भांत वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही, असे शंभूराज देसाई यांनी म्हंटल.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/358550702890869/

आमच्या सारख्या राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करा.म्हणूनच आम्ही एकनाथजी शिंदे यांच्यासोबत येण्याचा हा निर्णय घेतला. आमची ही भूमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्वसामान्य शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी विनंती शंभूराजे देसाई यांनी केली आहे.

आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्वाचा ज्वलंत विचार आम्ही काल ही सोडलेला नाही, आजही सोडलेले नाही, उदयाही सोडणार नाही. आम्ही शिवसैनिकच आहोत. आम्ही या विचाराने ४१ आमदार एकत्र असून शिवसेना टिकली पाहिजे हे आमचे धोरण आहे.

Leave a Comment