Site icon Hello Maharashtra

आदित्य ठाकरेंच्या सभेवर शंभुराज देसाईंची सडेतोड प्रतिक्रिया; म्हणाले…

aditya thakre and shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
आज माझ्या पाटण मतदार संघात आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा पार पडली. या निष्ठा यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सामील होते. त्यामुळे राष्ट्रवादी पुरस्कृत ठाकरेंची निष्ठा यात्रा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघात वेळ दिल्यास आदित्य ठाकरेंच्या सभेच्या गर्दीच्या 50 पट गर्दी दाखवून देवू असे जाहीर आव्हान पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह ठाकरे गटाला दिले.

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे आज आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा संपन्न झाली यानंतर आमदार शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी या निष्ठा यात्रेवर जोरदार टीकास्त्र सोडले. आमदार देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, माझ्या मतदारसंघात निष्ठा यात्रेस गर्दी जमवण्यात आली. सदरील गर्दी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचीच होती. तसेच कराड दक्षिण, कराड उत्तर व सातारा जिल्ह्यातून केवळ 7 हजार कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. परंतु या सभेच्या 50 पट गर्दी दाखवून देवू.

नरेंद्र पाटील यांच्यावर सडकून टीका
मल्हारपेठ येथे आज झालेल्या सभेत माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी शंभुराज देसाई पुन्हा निवडून येणार नाहीत, असे म्हटले. परंतु 2014 साली शिवसेना पक्षाच्या चिन्हावर दगडूदादा सकपाळ यांना स्वतःच्या सातारा -जावली संघात केवळ 20 ते 22 हजार मते मिळाली होती. त्यावेळी ते चौथ्या स्थानावर होते. तेव्हा अशा लोकांनी माझ्याबद्दल न बोललेले बरे. दुसरा एक फडतूस कार्यकर्ता जो एका पक्षात आणि त्याची पत्नी दुसऱ्या पक्षात त्याने माझा एकेरी उल्लेख केला. परंतु त्याचे नाव घेण्याइतका तो मोठा नाही, असा टोला नरेंद्र पाटील यांना शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी लगावला.

हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा