शरद पवारांच्या या 5 गौप्यस्फोटांमुळे राजकरणात खळबळ; निवडणुकीनंतर पालटणार फासे??

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आता या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आगामी काळात काय परिणाम होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, “एकेकाळी नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे 2004 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते” असेही शरद पवार यांनी म्हणल्यामुळे राजकिय चर्चांचा जोर वाढला आहे.

शरद पवारांचे 5 मोठे गौप्यस्फोट

  • लोकसत्ताला मुलाखत देताना शरद पवारांनी गौप्यस्फोट केला की, “2004 साली काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्याने मला मुख्यमंत्री पदाची संधी होती, मात्र मी अधिकची इतर मंत्रीपदे घेऊन मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं.”
  • “विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. पण त्यांचं नावच आमच्यापुढे आले नाही. एकनाथ शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाली असल्याचे नंतर आम्हाला समजले” असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
  • “2014 सालीच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होता. भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. शिवसेना भाजपसोबत गेल्यामुळे 2014 मध्ये महाविकास आघाडीचा आमचा प्रयोग फसला गेला.” असेही शरद पवारांनी सांगितले.
  • “काँग्रेसबाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात. आपला पक्ष विलीन करण्याचा विचार नाही. पुढे हा पर्याय त्याज्य नाही” असे मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी सांगितलं.
  • त्याचबरोबर, “प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता. तरी ही युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद दिले. प्रफुल्ल पटेल सारखे सांगायचे की, या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत. वाजपेयींना पर्याय नाही. आपण सगळेच भाजपमध्ये जाऊयात. परंतु आम्ही याला नकार दिला. शेवटी त्यांना तुम्ही जा म्हणून सांगितलं” असे शरद पवार म्हणले.