हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह या संदर्भात महत्त्वाचा निकाल दिला आहे. या निकालात आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला आज चार वाजेपर्यंत त्यांच्या पक्षासाठी नाव आणि चिन्हाचे पर्याय पाठवण्यास सांगितले होते. या आदेशावरूनच शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. ती नावे पुढीलप्रमाणे आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाकडून आज निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या नावांमधील पहिले नाव, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार असे आहे दुसरे नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे आहे. तर तिसरी नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस असे आहे. ही तिन्ही नावे निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून पाठवण्यात आले आहेत. यातील एका नावावर निवडणूक आयोग आपला शिक्कामोर्तब करेल.
मुख्य म्हणजे, आज शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवला असला तरी पक्षाच्या चिन्हासंदर्भात कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर करण्यात येत नसल्यामुळे शरद पवार गटाकडून चिन्ह पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शरद पवार गटाला नेमके कोणते नवीन नाव मिळते याकडे लागले आहे.