विधानसभेत पिपाणी नाहीतर तुतारीच वाजणार!!उमेदवारांच्या विजयासाठी शरद पवारांची नवी खेळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आले आहे. या उमेदवारांनी पिपाणी चिन्हावर लाखभर मते घेतली आहे. परंतु आता यानंतर निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे. याबाबत गटाने आयोगाला पत्र लिहिले आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार घडाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. परंतु निवडणुकीत या चिन्हाला जुळणारे पिपाणी चिन्ह काही अपक्ष उमेदवारांना देण्यात आले आहे. याचाच फटका पवारांच्या उमेदवारांना बसला आहे. कारण की, पिपाणी चिन्हामुळे साताऱ्यात संजय गाडे यांचा विजय झाला तर शशिकांत शिंदे यांचा पराभूत झाला. शशिकांत शिंदेंच्या साताऱ्यात झालेल्या पराभवाचे कारणच तुतारी आणि पिपाणी चिन्हात झालेला गोंधळ आहे.

त्यामुळेच पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत याच कारणामुळे शरद पवार गटाला फटका बसू नये म्हणून शरद पवार गटारे पिपाणी चिन्ह वगळण्यात यावे, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. आता शरद पवार गटाची ही विनंती आयोगाने मान्य केल्यास पिपाणी चिन्ह वगळण्यात येईल. यामुळे याचा थेट फायदा शरद पवार गटाला होईल.