टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, कारण अजिंक्य रहाणेच्या मागे ‘पवार ब्रँड’!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातीत लोळवल्या नंतर भारतीय संघ मायदेशी दाखल झाला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कामगिरी नंतर भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाचं विमान मुंबईत उतरल्याचं सांगण्यात येत आहे. बायो बबलमुळं टीम इंडियाला क्वारनाटईन व्हावं लागणार होतं‌. त्यामुळं मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं विमान उतरण्याची परवानगी आधी मिळाली नव्हती. पवारांनी सूत्रं हलवल्यानंतर ही परवानगी देण्यात आली. अन्यथा टीम इंडियाचं विमान थेट चेन्नईत उतरलं असतं.

तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम मुंबईत आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना कडक निर्बंध घालून सक्तीने  सात ते 14 दिवस क्वारंटाईन केलं जातं. मात्र तब्बल 5 महिन्यांनी मुंबईत परतणाऱ्या आणि जगात भारताचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या टीम इंडियाच्या या योध्यांसाठी क्वारंटाईनची बाऊण्ड्री लावण्यात आली नाही. विमानतळावर केवळ RTPCR Test करुन भारतीय खेळाडूंना घरी सोडण्यात आलं.

रात्री उशीरापर्यंत शरद पवारांनी मुंबई मनपा अधिकारी आणि राज्य शासनाच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसोबत बोलून चर्चा केली आणि यातून तोडगा काढल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंबईमध्ये परतल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाईनची नियमावली लावणार का? याबाबत गोंधळ सुरू होता. पण शरद पवारांनी राज्य शासन आणि मुंबई महापालिका यांच्यात समन्वय केल्याची माहिती एमसीएच्या एका वरिष्ठ सदस्याने दिली.

भारतीय खेळाडूंना मुंबईमध्ये क्वारंटाईन व्हावं लागलं असतं तर त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये सहभागी होता आलं नसतं, कारण 5 फेब्रुवारीपर्यंत त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं असतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातली टेस्ट सीरिजही 5 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यासाठी भारतीय टीम 27 जानेवारीला बायो-बबलमध्ये जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment