हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्यातील वातावरण दूषित करताय, शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता पवारांनी (Sharad Pawar) आपल्या शैलीत राज ठाकरेंवर (Raj Thackeray) पलटवार केला आहे. राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला माहीत नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही, संपूर्ण महाराष्ट्र मला ओळखतो असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला कळलेले नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही. मला माझा महाराष्ट्र ओळखतो. माझी अशी पार्श्वभूमी नाही, मी कधीही आग्रह केलेला नाही करणार नाही. त्यांनी कारण नसताना माझे नाव घेतले आहे. आज मी पण संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. माझ्या पण गाड्या अडवल्या जात आहेत. आता हे पण पवारांनी सांगितलय का मला अडवा… असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच मणिपूरबाबत मी जे काही बोललो त्यातहातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो. मी बोललो हे हातभाराचे लक्षण आहे की सौजन्याचे लक्षण आहे? असा प्रतिसवाल शरद पवारांनी केला आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी म्हंटल होते कि, मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत आहेत. आज आपण बघतोय कि जातीच्या आधारवर आरक्षण देण्याची मागणी होतीये आणि यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा हात आहे. शरद पवार म्हणतात कि महाराष्ट्राचा मणिपूर होईल म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे ते समजतंय. हे जे काही सुरु आहे ते सर्व विधानसभेसाठी सुरू आहे. जरांगेच्या मागून मते मिळवण्यासाठी या लोकांचे प्रयत्न आहेत. पुढच्या तीन महिन्यात दंगली घडवण्याचा यांचा प्लॅन आहे. पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी सुरू केली, तेव्हापासुन जाती- जातीमध्ये द्वेष निर्माण झाला. शरद पवारांनी आरक्षणासाठी मोदींकडे शब्द का टाकला नाही? असा सवाल करत राज ठाकरेंनी पवारांना आपलं लक्ष्य केलं होते.