अजितदादांच्या हातून घड्याळ जाणार? पवारांनी टाकला मोठा डाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा मोठा डाव टाकला आहे. खरं तर अजित पवारांच्या बंडखोरी नंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) दिले तर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणुकीसाठी देण्यात आलं आहे. सध्या यावरून सुप्रीम कोर्टात केस सुद्धा सुरु आहे. मात्र जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत घड्याळ हे चिन्ह (NCP Logo) गोठवण्यात यावं आणि अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या, अशी मागणी शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्त्वाचे आहे, घड्याळ या चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली. जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे चिन्हच गोठवण्यात यावं, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्ट नक्की सुनावणी कधी घेणार हे आज येणाऱ्या कोर्टाच्या प्रकरण यादीवरुन स्पष्ट होईल. खरं यापूर्वी सुद्धा २ वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यावर सुनावणी झाली नाही.

तुतारी वरूनही पवारांनी दाखवली पॉवर –

दरम्यान, निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यानंतर सुद्धा अगदी कमी वेळेत पवारांनी राजकीय डावपेच दाखवत पक्षाला मोठं यश मिळवून दिले. लोकसभा निवडणुकीत नवीन चिन्ह असूनही शरद पवारांनी आपली पॉवर दाखवत १० पैकी ८ खासदार निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांकडे घड्याळ चिन्ह आणि अनेक दिग्गज नेते असूनही त्यांना लोकसभेला अवघी एकच जागा जिंकता आली. आता विधानसभा निवडणुकही अजित पवार आणि महायुती सरकारला कात्रजचा घाट दाखवण्यासाठी पवारांनी आपले डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. अनेक बडे नेते तुतारीच्या वाटेवर आहेत. जस जस निवडणूक जवळ येत आहे तस तस शरद पवार आपले पत्ते उघडत आहेत.