सातारा सभेच्या वर्षपूर्तीवर रोहित पवारांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना सुनावले खडेबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची ती भर पावसातील ऐतिहासिक सभा मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर ला झाली होती. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षाचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते. आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरगोस पाठिंबा देत होती. जसा पाऊस बरसत होता तसेच पवारही भाजपवर बरसत होते. त्याच्या थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. सत्तेची आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी महाआघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपच्या गर्वाचे घर खाली आले.साताऱ्याचा गढ राखण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वत: रणांगणात उतरले होते. आज त्या सभेला एक वर्ष झालं, त्यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पडत्या काळात पक्षाला सोडुन गेलेल्या नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे रोहित पवारांनी पडत्या काळात राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यांवर कडक शब्दात टीका केलीय.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1317696062006517760?s=20

‘राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. पण, स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडलेत. यातील काहींकडं पद जरुर आहे पण लोकांमधील पत मात्र त्यांनी जरूर तपासून घ्यावी. कदाचित त्यांना एकटं पाडून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही ते ज्या पक्षात आहेत त्यांचा हा डाव असू शकतो. काही का असेना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र दगाबाजांना कधीही थारा देत नाही, असे म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर जबरी वार केलाय. यासोबतच, एक व्हिडिओ शेअर करता रोहित यांनी त्या नेत्यांचं नाव न घेत व्हिडिओतून चित्रीकरणाद्वारे त्यांचे चेहरे समोर आणले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment