हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 2 दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असून आज त्यांनी मराठवाडा कँसर हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी स्वतः आपल्या आयुष्यात कॅन्सर कशी मात केली याबाबत माहिती देताना तेव्हाचा एक किस्सा सांगितला.
शरद पवार म्हणाले, मला कॅन्सर झाला तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुमची सगळी काम उरकून घ्या, तुमचं आयुष्य फक्त 6 महिन्याचे आहे. तेव्हा मी त्याला सांगितले आपण हवं तर पैज लावू, पण मी काय लवकर जात नाही. जास्तीत जास्त तुला घालवल्याशिवाय तरी मी जात नाही. ती गोष्ट 2004 ची आहे, आज 2022 असून मी आठवड्यातून चार दिवस बाहेर फिरतो. कॅन्सरला घाबरायचं नाही, त्याच्याविरोधात लढायचं आणि हीच लढाई मी जिंकलो असं शरद पवारांनी सांगितलं.
यावेळी शरद पवार यांनी किल्लारी भूकंपाचेही उदाहरण दिले. किल्लारी भुकंपात अनेक लोक मृत्युमुखी पडली. त्यानंतर मी तातडीने तिकडे पोचलो. मी तिथेच थांबलो आणि त्या भागात पुनर्वसन केलं. संकटावर मात करण्याची इच्छाशक्ती मोठी होती अशी आठवण शरद पवारांनी करून दिली.