अहमदाबाद प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला सत्तेबाहेर खेचण्यासाठी काँग्रेससह सर्वच प्रमुख पक्षांनी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्थापन करण्यात येणाऱ्या महाआघाडीचे नेतृत्व कोण करणार आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असणार यावरून महाआघाडीचे घोडे अडले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाआघाडीच्या घटक पक्षांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
सध्या महाआघाडीला पंतप्रधानपदाच्या उमेदवारांविषयी विचार करण्याची गरज नाही, आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधानपदाच्या उमेद्वाराबाबत विचार करा, असा निर्वाणीचा सल्ला पवार यांनी दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली होती. महाआघाडीच नेतृत्व कोण करणार याच स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते. राज्या-राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या प्रभावानुसार त्या-त्या ठिकाणी भाजपाविरोधी महाआघाडीचा मुख्यमंत्री होईल. पश्चित बंगालमध्ये ममता बॅनर्जी, केरळमध्ये डीएमके, आंध्रप्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी आणि हरियाणा व पंजाबमध्ये काँग्रेसकडे नेतृत्व असेल, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?