शरद पवार कृषी कायद्यांबाबतीची आपली भुमिका बदलणार? केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केले मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालच मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि पवार कृषीमंत्री असताना कायद्यात सुचवलेले बदल यांची तुलनात्मक समिक्षा केली होती. त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आपलं मत मांडलं आहे. नव्या कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. उलट यामुळे अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामध्ये दोन्हीही व्यवस्था कायम राहतील, असं तोमर यांनी म्हटलं आहे.

शरद पवार साहेब एक ज्येष्ठ राजकारणी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री आहेत. त्यांना कृषीशी संबंधित मुद्द्यांवरील आणि त्यावरील उपाय काढण्यात परिपूर्ण मानले जाते. यापूर्वी त्यांनी देखील शेतीविषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हंटल आहे.

ते म्हणाले, पुढे म्हणले, “पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने मला असे वाटते की त्यांच्या समोर तथ्य चुकीचे मांडले गेले आहे. आता त्यांना योग्य तथ्ये कळू लागली आहेत तर मला वाटते की कृषी कायद्याबाबत ते त्यांचे दृष्टीकोन बदलतील आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्या फायद्यांविषयी जागरूकही करतील.

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना आपला माल कोणालाही आणि कुठेही विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करुन देतात. आपल्या राज्याबाहेरही त्यांना माल विकता येणार असून त्याबदल्यात त्यांना चांगली किंमतही मिळेल. याचा सध्याच्या किमान आधारभूत किंमत व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. नव्या कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. उलट यामुळे अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामध्ये दोन्हीही व्यवस्था कायम राहतील, असंही तोमर यांनी म्हटलं आहे.

शरद पवार नक्की काय म्हणाले होते –

तीन कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांगितले की या कायद्यांचा एमएसपीवर विपरीत परिणाम होईल आणि मंडई व्यवस्था कमजोर होईल. शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत सर्वपक्षीय बैठकीला डिजिटल माध्यमातून उपस्थित राहिले होते. बैठकीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रस्तावित अजेंडा, शेतकरी आंदोलन, महिला आरक्षण विधेयक व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment