अरे मूर्खा कुठे भटकतोस? इकडे ए…; अंदमानातून पोंक्षेंनी दिलं राहुल गांधींना थेट आव्हान

Sharad Ponkshe Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज बुलडाण्यात दाखल झाली. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी काल सावरकरांबद्दलएक वादग्रस्त वक्तव्य केले असल्याने सिने अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुक पोस्टद्वारे एक व्हिडिओ शेअर करत थेट राहुल गांधींना आव्हान दिलं आहे. “असे मुर्खा कुठे भटकतोयस? इकडे ए हि बघ सावरकरांची अंदमानातील कोठडी. इकडे येऊन बघ…’ असा व्हिडीओ ट्विट करत पोंक्षेनी राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला आहे.

शरद पोंक्षे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून अंदमान येथील सेल्युलर जेलमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. सावरकर जेलमधील ज्या खोलीत राहिले त्या खोलीमध्ये जाऊन त्यांनी व्हिडिओ शूट केला असून “या खोलीत एक दिवस सावरकर राहिले त्या अवस्थेत राहून दाखव, असे आव्हान देखील त्यांनी केले आहे

https://www.facebook.com/watch/?v=3279017418977222

राहुल गांधी यांनी काल सावरकरांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला विरोध करत मनसे आणि भाजपने आज निदर्शने केली. भाजपकडून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.