औरंगाबाद – नांदेडमधील शारदा भवन संस्थेतील प्रकरणी खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
यासंदर्भात औरंगाबादच्या खंडपीठाने अशोक चव्हाण यांना अवमानना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेत कार्यरत प्राध्यापकाला संपूर्ण वेतन देण्याचे आदेश असतानाही त्याचे पालन न करण्यात आल्याने बांधकाममंत्री चव्हाण यांना नोटीस बजावण्यात आल्याने या प्रकरणात आता पुढे काय होते, हे पाहणेही तितकेच औत्सुक्याचे ठरणाार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group