Share Market मध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, FMCG-ऑटो सेक्टरमध्ये वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गुरुवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. आज, बीएसई सेन्सेक्स 337.06 अंकांनी किंवा 0.57 टक्क्यांनी घसरून 59119.72 वर तर निफ्टी 50 88.50 अंकांनी किंवा 0.50 टक्क्यांनी घसरून 17629.80 वर बंद झाला. बँक निफ्टीची घसरण ही सेन्सेक्स आणि निफ्टीच्या बाबतीत 50 टक्क्यांहून जास्त होती. आज बँक निफ्टी 572.85 अंकांनी (1.39 टक्क्यांनी) घसरून 40630.60 वर बंद झाली.

DHFL share price: Stock market update: 83 stocks hit 52-week lows on NSE - The Economic Times

जर बँक निफ्टीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ फायनान्स सर्व्हिसेस 1.38 टक्के, रिएलिटी 0.28 टक्के आणि आयटी 0.23 टक्क्यांनी घसरले. याउलट FMCG इंडेक्समध्ये 1.30 टक्क्यांनी वाढ झाली. ऑटो सेक्टरमध्येही आज (0.74 टक्के) वाढ झाली. स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्स किरकोळ वाढ झाली. Share Market

निफ्टी 50 मध्येही आज घसरण झाली, मात्र दिवसभर तो एका रेंज मध्ये ट्रेड करत राहिला. सकाळी तो 17,609.65 वर उघडला आणि 17629.80 वर बंद झाला. या दरम्यान, त्याने 17,722.75 चा High आणि 17,532.17 चा Low बनवला. Share Market

stock market crash: D-Street's worst day in 7 months as investors lost Rs 1,850 crore per minute - The Economic Times

हे लक्षात घ्या कि, अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने बुधवारी सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली. यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात 0.75% वाढ करण्याची घोषणा केली, ज्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. तसेच यूएस फेडकडून येत्या बैठकीत व्याजदरात आणखी वाढ करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. Share Market

Why the stock market and bitcoin keep crashing - Vox

याआधीही 27 जुलै रोजी व्याजदरात वाढ करण्यात आली होती. सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे यूएस फेड सध्या चिंतेत आहे. याबाबत यूएस फेड म्हणते की,” ते महागाई 2% पर्यंत खाली आणण्यासाठी वचनबद्ध आहेत.” तसेच मध्यवर्ती बँकेचा अंदाज आहे की,” ते 2023 पर्यंत व्याजदर 4.6 टक्क्यांपर्यंत नेऊ शकतात. बेंचमार्क दर वर्षाच्या अखेरीस 4.4 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. यानंतर 2023 मध्ये 4.6 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.” Share Market

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

Rupee Co-operative Bank ला आजपासून ठोकले जाणार टाळे

Bank FD : आता ‘या’ बँकेकडून FD वर मिळणार 7.70 टक्के व्याज, व्याज दर तपासा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर तपासा

गेल्या 23 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 34,930% रिटर्न