Share Market । बॉयोफ्यूएल कंपनी प्राजच्या शेअर्सचा गुंतवणूकदारांना नेहमीच फायदा होताना दिसतो. आता देखील कंपनीच्या शेअर्सने चार महिन्यांच्या आतच गुंतवणूकदारांना ३६ टक्के पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. इथून पुढे सुद्धा प्राजच्या शेअर्समध्ये आणखीन वाढ होऊन गुंतवणूकदारांना दुप्पटीने फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्राजच्या शेअर्सना कसा फायदा झाला? (Share Market)
प्राज इंडस्ट्रीचे सध्याचे शेअर्स ४०८ रुपयांवर ट्रेड करत आहेत. त्यामुळे पुढे ते २३ टक्क्यांपेक्षा वर जाऊ शकते. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, सध्या इंडियन ऑइलसोबत केलेल्या भागीदारीमुळे बाजारातील तज्ज्ञ प्राजबाबत सकारात्मक असल्याचे दिसत आहेत. गेल्या २० वर्षात प्राजच्या शेअर्समध्ये ११७९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे अनेक गुंतवणूकदार कोट्यवधी बनले आहेत.
काही काळापूर्वी प्राज आणि इंडियन ऑइल यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार, देशातील बॉयोफ्यूएल्स प्रोडक्शनची क्षमता मजबूत करण्याची योजना आखली होती. पुढील काळात याचाच फायदा प्राजला होणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी कंपनीचे शेअर्स ४६१.५० रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होते.
परंतु २०२३ मध्ये कंपनीला नुकसान होत हे शेअर्स खाली घसरले. पाच महिन्यांतच ते ३५ टक्क्यांहून २९९ रुपयांवर आले. आता पुन्हा एकदा कंपनीने भरारी घेतली आहे. इंडियन ऑइलसोबत झालेल्या करारानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. पुढे ही यात आणखीन फायदा मिळेल असे तज्ञांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला इंडियन ऑईलच्या शेअर्समध्ये देखील तीन महिन्यांपासून तेजी पाहिला मिळत आहे. गेल्या एक आठवड्यापूर्वी इंडियन ऑईलच्या प्रति शेअरची किंमत ९५.१५ रुपये अशी होती. त्यानंतर यामध्ये घसरण होऊन ती ९४.३० रुपयांवर आली.