नवी दिल्ली । मंगळवारी, 11 जानेवारी 2022 रोजी भारतीय शेअर बाजार ग्रीन मार्कवर होता. निफ्टी 50 0.29% म्हणजेच 52.50 अंकांच्या वाढीसह 18055.80 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स 0.37% किंवा 221.26 अंकांनी वाढून 60616.89 वर बंद झाला. निफ्टी बँक इंडेक्स 0.25% किंवा 94.30 अंकांच्या वाढीसह 38442.20 वर बंद झाला.
मंगळवारी दिवसभरात बाजार वर किंवा खाली जाताना दिसत होता, मात्र शेवटी निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी वाढीने बंद झाले. याशिवाय बहुतांश निर्देशांकही ग्रीन मार्कवर बंद झाले. रेड मार्कवर बंद होणाऱ्या निर्देशांकांमध्ये मेटल (-1.90%) अव्वल आहे, तर FMCG (-0.35%), ऑटो, PSU बँका आणि फार्मा यांचा समावेश आहे. ऊर्जा (+1.23%) आणि IT (+1.03%) क्षेत्रांमध्ये सर्वात मोठा फायदा झाला.
निफ्टी 50 चे टॉप गेनर्स आणि टॉप लूझर्स
एचसीएल टेक्नॉलॉजीज (+4.31%), अदानी पोर्ट्स (+3.55%), एचडीएफसी (+1.93%), ओएनजीसी (+1.64%) आणि टेक महिंद्रा (+1.23%) हे निफ्टी 50 च्या टॉप गेनर्समध्ये सहभागी होते. तर 10 जानेवारी 2022 च्या टॉप लुझर्समध्ये JSW स्टील (-3.93%), टाटा स्टील (-3.32%), भारत पेट्रोलियम (-1.61%), कोल इंडिया (-1.34%) आणि हिंदाल्को (-1.33%) यांचा समावेश होता.
लक्षात घेण्यासारख्या गोष्टी
>> आजच्या ट्रेडिंगमध्ये स्मॉल- मिडकॅप शेअर्समध्ये मंदी होती.
>> BSE मिडकॅप इंसेक्स 0.01 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 25,651.53 च्या पातळीवर बंद झाला.
>> स्मॉलकॅप इंसेक्स 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 30,446.16 वर बंद झाला.
>> आजच्या ट्रेडिंगमध्ये मेटल इंडेक्स वगळता सर्व सेक्टरल इंडेक्समध्ये खरेदी दिसून आली.
>> निफ्टीचा मेटल इंडेक्स आज 2 टक्क्यांनी घसरून बंद झाला. आयटी, पॉवर, ऑइल अँड गॅस आणि रियल्टी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.