टाटा समूह आयपीएलचे नवे टायटल स्पॉन्सर; VIVO ची माघार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी आयपीएल २०२२ साठी मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलची स्पॉन्सरशिप घेतलेल्या चीनच्या विवो कंपनीने (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

विवो ही चीनी कंपनी काही दिवसांपासून आयपीएल टायटल स्पॉन्सर होती. पण आता बीसीसीआयने विवो कंपनीला डच्चू देत ही संधी आता टाटा या कंपनीला दिली आहे. आता पुढच्या वर्षापासून टाटा ही कंपनी आयपीएलची टायटल स्पॉर्न्सर असणार आहे. त्यामुळे आता आयपीएल ला ‘ टाटा आयपीएल’ असं म्हंटल जाईल

दरम्यान देशात कोरोना परिस्थिचीचा प्रभाव आयपीएल वर पडण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2022 चे मेगा ऑक्शन दहा दिवसांनी पुढे जाऊ शकते. आयपीएल 2022 चे मेगा ऑक्शन सात आणि आठ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता क्रिकेट वेबसाइट क्रिकबजने काही दिवसांपूर्वी वर्तवली होती.

You might also like