हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील अनिश्चितता हि कधीच स्थिर नसते . कधी ती गुंतवणूकदारांना अपेक्षेहून जास्त नफा मिळवून देते तर कधी त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे करते . शेअर बाजारात जेव्हा तेजीचा काळ असतो तेव्हा सर्वत्र आनंदाचे वातावरण असते तर मंदीच्या काळात मुंबईच्या दलाल स्ट्रीटवर शुकशुकाट पहावयास मिळतो. थोडक्यात काय ? तर कभी ख़ुशी कभी गम असे वातावरण असलेल्या शेअर बाजारात कधी बाहेर पडायचे हे सूत्र ज्याने जाणले त्याला शेअर बाजार कळला असे म्हणता येईल. आज शेअर मार्केट मध्ये चांगलीच चमक पाहायला मिळाली. आज SENSEX 61700 पार असून निफ्टीमध्येही वाढ दिसून आली.
आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. बघता बघता सेन्सेक्सने आजवरच्या विक्रमी अश्या 61500 ह्या जादुई आकड्याना पार करत एक इतिहास रचला. सुरुवातीच्या व्यवहारात SBI, HCL Tech, Infosys, Tech Mahindra, Nestle, Asian Paints, ICICI बँक यांच्यासह 22 शेअर्सचे भाव सकाळी वधारले होते. तर आयटीसी , मारुती, एल अँड टी टाटा स्टील सारख्या कंपनीच्या शेअर्स च्या भावांनी घसरण नोंदवली आहे .
सकाळी शेअर बाजार उघडताच बँक निफ्टी, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी आयटी, निफ्टी मीडिया, पीएसयू बँक, काही खाजगी बँकांचे शेअर्स , हेल्थकेअर इंडेक्स ह्यांचे भाव सकाळी वधारले होते. पण मग आज अदानी समूहाच्या 10 पैकी 7 कंपन्यांना त्यांचा दर घसरल्याने नुकसान सहन करावे लागत होते. अदानी टोटल आणि अदानी ट्रान्समिशनची स्थिती हि सध्या अत्यंत नाजूक असून त्यांचे अदानी ग्रीन, अदानी पॉवर, अदानी विल्मर आणि एनडीटीव्ही हे शेअरदेखील आपल्या दरात घसरण नोंदवत होते . तर, ACC, अदानी एंटरप्रायझेस आणि अंबुजा सिमेंटच्या शेअरने शेअर बाजारात हलकीशी सकरात्मकता दाखवली. नंतर सेन्सेक्स 136 अंकांनी घसरून 61295 च्या पातळीवर आला . त्याचप्रमाणे निफ्टीही 47 अंकांनी घसरल्यानंतर 18082 च्या पातळीवर व्यवहार करत होती हिरो मो टर्स, यूपीएल, हिंदाल्को, कोल इंडिया आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांचे कालमर्यादेत निफ्टी चे सर्वाधिक नुकसान केले. तर इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस आणि विप्रो ह्या शेअर ने निफ्टीत सकारात्मक व्यवहार दर्शवला .