मुंबई । वीकली एक्सपायरीवर मार्केट काठावर बंद होण्यात यशस्वी झाले आहे. गुरुवारी दिवसभराच्याअंती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 384.72 अंकांच्या किंवा 0.68 टक्क्यांच्या वाढीसह 57,315.28 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 117.15 अंकांच्या किंवा 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 17,072.60 वर बंद झाला.
एका दिवसापूर्वी सेन्सेक्स 56,930.56 च्या पातळीवर बंद झाला
याआधी बुधवारी सेन्सेक्स 611.55 अंकांच्या किंवा 1.09 टक्क्यांच्या वाढीसह 56,930.56 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 184.60 अंकांच्या किंवा 1.10 टक्क्यांच्या वाढीसह 16,955.45 वर बंद झाला.
Tata Motors ने स्वतःची ईव्ही उपकंपनी स्थापन केली आहे
देशातील आघाडीच्या वाहन निर्मात्या टाटा मोटर्सने बुधवारी माहिती दिली की त्यांनी Tata Passenger Electric Mobility Limited नावाची कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक मोटर वाहने बनवणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने 21 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीसाठी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन जारी केले आहे.