Tuesday, June 6, 2023

Share Market : ग्रीन मार्कने सुरु होऊन शेअर बाजार रेड मार्कवर बंद, निफ्टी 17500 च्या खाली

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजार सकाळी ताकदीने उघडले होते मात्र ट्रेडिंगच्या शेवटी ते रेड मार्कने बंद झाले. दिवसभरातील चढ-उतारांदरम्यान बाजारात नफावसुलीचे वर्चस्व होते. ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स 237.44 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 58,338.93 वर बंद झाला.

दुसरीकडे, निफ्टी 54.65 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 17,475.65 वर बंद झाला. सेन्सेक्स, निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. आजच्या ट्रेडिंगमध्ये एफएमसीजी, मेटल, फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. दुसरीकडे, ऑटो, बँक, रियल्टी, आयटी शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

हरिओम पाईप शेअरची किंमत
हरिओम पाईप इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी बुधवारी शेअर बाजारात जोरदार पदार्पण केले. शेअर बीएसईवर 214 रुपयांवर उघडला तर एनएसईवर तो 220 रुपयांवर उघडला. अशाप्रकारे, IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी स्टॉकला सुमारे 44 टक्के प्रीमियम मिळाला आहे. या मजबूत रॅलीनंतरही बाजारातील एक्सपर्ट अजूनही शेअरबाबत तेजीत आहेत.

अब्जाधीश गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी चेन्नईस्थित दोन कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये दीर्घकालीन विश्वास ठेवून गुंतवणूक केली आहे. त्यांनी एन श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखालील द इंडिया सिमेंट्स लिमिटेड (ICL) मध्ये त्यांचा हिस्सा वाढवला आहे. तर त्याच वेळी, देशातील सर्वात मजबूत आणि प्रतिष्ठित नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक असलेल्या सुंदरम फायनान्स लिमिटेड (SFL) मध्ये आपले पैसे गुंतवले आहेत.

उद्या बाजार बंद
आज बुधवार हा या आठवड्यातील शेवटचा ट्रेडिंगचा दिवस होता. कारण पुढील चार दिवस बाजाराचे दिवस असतील. गुरुवार आणि शुक्रवारी बाजाराला सुट्टी असते आणि शनिवार आणि रविवारी साप्ताहिक बंद असते. आता सोमवारी थेट बाजार सुरू होतील. त्याचा परिणाम बाजारावरही दिसून आला आणि नफावसुलीचा बोलबाला झाला. इन्फोसिसचे निकालही आज संध्याकाळी येणार आहेत. हा महिना त्रैमासिक निकालाचा असेल, त्यामुळे गुंतवणूकदार सावधगिरीने वाटचाल करत आहेत. तसेच चलनवाढीमुळे बाजारात काहीशी अस्थिरता आणि सावधता आहे.