हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्त्री फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत असते. मात्र आता या अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीने आपले टॉपलेस लूकमधील काही छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर करून पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) बाबतही बिनधास्तपणे चर्चा केली आहे. फ्लोराने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की,” वाढलेल्या वजनामुळे तिला अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागले आहेत.”
फ्लोराच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
फ्लोराने आपले टॉपलेस फोटो शेअर करत सांगितले की, शाळेत असताना ती जाड होती. तिच्यात अजिबात आत्मविश्वास नव्हता. मात्र तरीही ती जशीतशी अभिनेत्री बनली. या अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिने आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत नेहमीच खूप संघर्ष केला आहे. तिलाही इतर अभिनेत्रींसारखे सुंदर आणि सडपातळ दिसायचे होते.
https://www.instagram.com/p/CcU4vnpMCNO/?igshid=YmMyMTA2M2Y=
फ्लोराने आपले दुःख व्यक्त करताना लिहिले की – दक्षिणेतील माझ्या करिअरच्या शिखरावर असतानाही मला 10-12 वर्षे कोणाचाही सपोर्ट मिळाला नाही, कारण लोकांना वाटायचे की ती प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी खूप लठ्ठ आहे.
फ्लोरा पुढे म्हणाली- “मला सांगण्यात आले होते की तुम्ही वजन कमी करा. माझ्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला माझ्या वजनामुळे मला खूप त्रास दिला गेला. एका लेडी कोरिओग्राफरने सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांसमोर माईकवर माझी बॉडी शेम केली होती.”
https://www.instagram.com/p/CcZx5W4Mqbg/
PCOS मुळे फ्लोराचे वजन कमी होत नव्हते
फ्लोराने आपल्या वाढत्या वजनामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, तिला PCOS आहे, ज्याचा आजकाल अनेक तरुण मुली सामना करतात.यामुळे तुमचे वजन कमी होत नाही. तुम्ही भलेही उपाशी राहा किंवा जिम करा, पण ते तुमचे वजन कमी होऊ देत नाही.
फ्लोराने पुढे लिहिले की – तुम्हाला असे वाटते की तुम्ही परफेक्ट नाही. यामुळे ती उपाशी रहायची. ती नेहमी उदास असायची, ज्याचा तिच्या शरीरावरच नाही तर मनावरही वाईट परिणाम होत असे.
https://www.instagram.com/p/CcC8utEJ6Fw/
फ्लोराने कठोर मेहनत करून तिच्या बॉडीला ट्रांसफॉर्म केले आहे. ती म्हणते की,” जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करता तेव्हा सर्वकाही परफेक्ट होते…आणि तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.” तुम्हाला फ्लोराचे ट्रांसफॉर्मेशन कसे आवडले ते जरूर सांगा.
https://www.instagram.com/p/Ca9-whysMJ7/
https://www.instagram.com/p/Cboja-Dr9oa/
https://www.instagram.com/p/CcE_T5UM76L/