स्वातंत्र्यदिनानिमित्त शशी थरुर यांचे ‘हंगर फ्रि इंडिया’ चे आवाहन

Hunger deaths in india
Hunger deaths in india
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टिम, HELLO महाराष्ट्र | स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस नेते शशी थरुर यांनी हंगर फ्रि इंडियाचे आवाहन केले आहे. ‘या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी प्रत्तेक भारतीयाला आवाहन करतो कि आपल्या देशाला उपासमार मुक्त करण्यासाठी प्रत्तेकाने पुढे यावे आणि आपापल्या स्तरावर काम करावे’ असे ट्विट शशी थरुर यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राॅबिनहूड आर्मी या संघटनेचे कौतुक केले असून ‘मी राॅबिनहूड आर्मी च्या कामाने प्रभावी झालो आहे’ असे म्हटले आहे.

सध्या भारतात उपासमारीमूळे मरण पावणार्यांची संख्या मोठी आहे. समाजात आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने आज काही लोकांना चवीनुसार हवे ते खाद्य पदार्थ खाण्यास मिळतात तर काहींना जिवंत राहण्यापुरतेही अन्न मिळत नाही. पोटाला काहिच खायला न मिळाल्याने उपासमार होऊन मरणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा हा प्रश्न लक्षात घेऊन राॅबिनहूड आर्मी नावाची सामाजिक संस्था यावर काम करत आहे.

राॅबिनहूड आर्मी ही संस्था उपासमारी विरोधात काम करत असून मोठमोठ्या रेस्टाॅरेंट मधील शिल्लक राहीलेले अन्न गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सध्या सदर संस्थेने भारताला उपासमार मुक्त करण्यासाठी प्रत्तेक भारतीयाने काम करावे असे आवाहन केले आहे. त्यावेळी ‘हंगर फ्रि इंडिया’ या त्यांच्या चळवळीला शशि थरुर यांनी ट्विटर वरुन आपला पाठींबा दर्शवला आहे.