काले गावच्या सुनबाईंची राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत ‘सुवर्णमय’ कामगिरी

Sheetal Desai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भोपाळ येथे सध्या सुरु असलेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक गेले आहेत. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले येथील सौ. शीतल प्रीतम देसाई यांनी 50 मीटर स्टँडर्ड पिस्टल क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले. काले गावच्या सुनबाई असलेल्या शीतल देसाई यांनी केलेल्या सुवर्णमय कामगिरीमुळे कालेसह तालुक्यातील लौकिकात भर पडली आहे.

कराड तालुक्यातील काले येथील सौ. शितल देसाई यांनी भोपाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर पिस्टल क्रीडा प्रकारात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक ती शस्त्रेही नव्हती. तरीही त्यांनी हार मानली नाही. अथक परिश्रम करत त्यांनी 25 मीटर पिस्टलने आपला सराव पुढे चालूच ठेवला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी 50 मीटर फ्री पिस्टल या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवले आहे. भोपाळ येथे 22 नोव्हेंबरपासून या स्पर्धेना प्रारंभ झाला आहे. 50 मीटर पिस्टल प्रकारात देशभरातील जवळपास 300 स्पर्धेक सहभागी झाल्याचे प्रितम देसाई यांनी सांगितले आहे.

यापूर्वीही मिळवलंय सुवर्णपदक

शितल देसाई यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कराड व मलकापूरमध्ये झाले आहे. यापूर्वीही त्यांनी 25 मीटर स्पोर्टस् पिस्टल व 10 मीटर एअर पिस्टल या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते. त्यांचे हे यश तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.

यश मिळवणे अवघड नाही

आपण जो क्रीडा प्रकार निवडतो, त्या क्रीडा प्रकारात अपयश आले तरी खूचन जाता कामा नये. क्र्रीडा प्रकारातील सर्व नियम लक्षात घेत प्रामाणिकपणे प्रयत्न करत जिद्दीने सराव सुरू ठेवल्यास कोणतही यश मिळवणे अवघड नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सुवर्ण पदक विजेत्या सौ. शितल देसाई यांनी दिली आहे.