Sheikh Hasina Verdict : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; जगाचे लक्ष्य आता भारताकडे

Sheikh Hasina Verdict
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sheikh Hasina Verdict । आंतरराष्ट्रीय पटलावरून एक मोठी घडामोड समोर येत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण कोर्टाने ही फाशीची शिक्षा सुनावली. 2024 साली बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता. याच हिंसाचारात शेकडो बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला. बांगलादेशी नागरिकांनी शेख हसिना यांचे सरकार उलथवून लावले होते. याच प्रकरणात शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.

काय आरोप होते ? Sheikh Hasina Verdict

खरं तर या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ठेवण्यात आले होते. मात्र, शेख हसीना यांच्याकडून हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आले होते. जुलै- ऑगस्ट 2024 मध्ये बांग्लादेशात मोठा हिंसाचार माजला होता. आंदोलकांनी बांगलादेशची संसद, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शेख हसिना यांनी लष्कर, पोलिसांना कारवाईचा आदेश दिला होता. हसीना यांच्या या आदेशामुळे बांगलादेश मधील हिंसाचार आणखी वाढला. या काळात महिला आणि मुलांसह १,४०० लोक मारले गेले आणि सुमारे २५,००० लोक जखमी झाल्याचा आरोप होता. या खटल्यात त्यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील ICT न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. Sheikh Hasina Verdict

जगाचे लक्ष्य भारताकडे –

शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने आता संपूर्ण जगाचे लक्ष्य भारताकडे आहे. यामागचं कारण म्हणजे शेख हसिना या भारतातच आश्रयाला आहेत. क्राईम ट्रिब्यूनलच्या आदेशानुसार शेख हसिना यांना फाशी द्यायची असेल तर त्यांना अगोदर बांगलादेशात घेऊन जावं लागेल. त्यासाठी भारतातून त्यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण करावे लागेल. अशावेळी भारत नेमकी काय भूमिका घेतो? कि ICT न्यायालयाचा आदेश पाळून शेख हसीना यांचे पुन्हा बांग्लादेशात परत पाठवतो ते बघावं लागेल.