Sunday, May 28, 2023

माझ्या तब्येतीबाबत चुकीच्या अफवा पसरवू नका…? काही काम नसेल तर घरी जेवायला या – शीला दीक्षित

नवी दिल्ली । दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यात आणि सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल  यांच्यात चांगलेच ट्विटर युद्ध तापले. शीला दीक्षित यांनी आपल्या ट्विटर वरुन केजरीवाल यांना आपल्या तब्येतीबाबत अफवा पसरवू नये असे आव्हान केले आहे. त्याचसोबत ‘माझ्या तब्येतीची एवढी काळजी असेल तर माझ्या घरी या व बघा, जेवण करा आणि त्याच बरोबर अफवा न पसरवता निवडणूक कशी जिंकता येते ते सुद्धा शिकुन घ्या.’

दीक्षित यांच्या या टिपण्णी वर केजरीवाल यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझ्या परिवाराने नेहमीच मला ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यास शिकवले आहे, त्यामुळे मी कधी ही तुमच्या तब्येतीबाबत बोललेलो नाही आहे. देव तुम्हाला चांगले आरोग्य व आयुष्य  देवो, ‘असा संदेश त्यांनी त्यांच्या ट्वीट मध्ये दीक्षित यांना 
प्रत्युत्तर देतांना दिला आहे.