पाण्याचा हौदात पडून मेंढपाळाच्या मुलीचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे इमारत बांधकामाच्या पाण्यासाठी बनवलेल्या पाण्याच्या हौदात पडून एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आशा चंद्रभान आहिरे, वय – 7 वर्षें (रा. बेलखेडा ता. कन्नड) असे मृत मुलीचे नाव आहे.

कन्नड तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब बेलखेडा येथील घाटमाथ्यावर काही दिवस मेंढ्या चराईसाठी आले होते. ती परतीच्या मार्गावर असताना बनोटी येथील ग्राम स्वच्छालय याच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर थांबले होते. बाजूलाच महसूल विभागाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते.

ठेकेदाराने पाण्यासाठी मोठा हौद बांधून त्यात पाणी साठले होते. चिमुकली आशा ही खेळता-खेळता हौदात जाऊन पडली. जवळ कोणीही नसल्याने ते कुणाच्याही लक्षात आले नाही. थोड्यावेळाने मुलगी दिसत नसल्याने आईने शोधाशोध केली असता पाण्याच्या हौदात मुलीचा मृतदेह आढळून आला.

Leave a Comment