…आणि शेरा म्हणाला हा स्पर्धक होऊ शकतो ‘बिग बॉस १३’चा विजेता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छोट्या पडद्यावरील रिआलिटी शो ‘बिग बॉस’ हा खुपच लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही या शोला विशेष पसंती मिळत आहे . अनेक गोष्टींसाठी हा शो कायमच चर्चेत असतो. लवकरच या शो चा ग्रॅण्ड फिनाले होणार आहे. त्यामुळे यंदाची ‘बिग बॉस १३’ची ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आणि त्यातच भर म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा याने यंदाच्या पर्वाचा कोणता स्पर्धक जिंकणार हे सांगितलं आहे .

एका खास मुलाखतीमध्ये बोलत असताना शेराने यंदाचा ‘बिग बॉस १३’चा विजेता कोण होणार हे सांगितलं आहे . शेरा हा सलमान खान याचा बॉडीगार्ड असून त्याच्या अगदी जवळच्या काही व्यक्तींपैकी एक मानला जातो. त्यामुळे शेराने बिग बॉस १३चा स्पर्धक आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा यंदाच्या पर्वाचा विजेता होईल असे वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . सिद्धार्थ हा शेराचा आवडता स्पर्धक आहे. त्यामुळे तो जिंकावा अशी शेराची मनोमन इच्छा आहे. तसंच तो जिंकेलही असा विश्वास त्याला आहे.

“सिद्धार्थ शुक्ला हा केवळ माझाचा नाही तर मी जेव्हा कोणत्याही तरुणीला अथवा महिलेला बिग बॉस १३च्या घरातला तुमचा आवडता स्पर्धक कोण असा प्रश्न केला तर त्यादेखील सिद्धार्थ याचचं नाव घेतील. सिद्धार्थला हरवणं वाटतं तितकं सोपं नाहीये”, असंही शेरा म्हणाला.
यंदाच्या ‘बिग बॉस १३’ या पर्वामध्ये सिद्धार्थ शुक्ला हा लोकप्रिय स्पर्धक मानला जात आहे. कारण त्याला प्रेक्षकांचा तसेच छोट्या पडद्यावरील काही
सेलिब्रिटींचा देखील पाठिंबा आहे.१४ फेब्रुवारी रोजी ‘बिग बॉस १३’चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात केवळ सात सदस्य बाकी आहेत. त्यामुळे नक्की हा शो कोण जिंकेल याविषयी सर्वाचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे आहे