Shiba Inu Coin : ‘या’ क्रिप्टोकरन्सीमध्ये 24 तासांत 45% वाढ, यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । Shiba Inu Coin देखील आजकाल खूप चर्चेत आहे. Shiba Inu Coin (SHIB) ने पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच, या क्रिप्टोच्या मूल्यामध्ये खूपच वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 45 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्याच्या मार्केट कॅपिटलायझेशनबद्दल बोलताना, बाजारातील टॉप 100 कॉईन्समध्ये ही सर्वात वेगाने वाढणारी क्रिप्टोकरन्सी आहे.

Shiba Inu Coin Ethereum पासून तयार केले गेले आहे आणि सध्याच्या मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने बाजारातील टॉप 100 कॉईन्समध्ये सर्वात वेगाने वाढणारी क्रिप्टोकरन्सी आहे. Dogecoin ला पर्याय म्हणून Shiba Inu Coin कडे पाहिले जाते.

24 तासांत 45% वाढ
गेल्या 24 तासांमध्ये Shiba Inu ची किंमत 45% वाढली आहे. मंगळवारी, Shiba Inu $ 0.00001264 वर ट्रेड करत होती आणि तिचा मार्केट कॅप $ 4,987,163,972 वर पोहोचले. सोमवारच्या तुलनेत हे 49% अधिक आहे. दरम्यान, सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सीचे दर सोमवारी घसरले. मात्र इतर काही नाण्यांमध्येही किंचित वाढ झाली.

यामुळे झाली वाढ
Tesla चे प्रमुख एलन मस्क यांनी रविवारी रात्री उशिरा Shiba Inu ला गती देण्यापूर्वी एक ट्विट केले. हे ट्विट सूचित करत होते की, Shiba Inu आता Dogecoin पासून वेगळे होऊ शकते. यामुळे, शिबा इनू फक्त एका दिवसात 49% वर चढला.

मस्कने शेअर केला पपीचा फोटो
मस्कने त्यांच्या पपीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि Floki Frunkpuppy लिहिले. क्रिप्टोकरन्सी उत्साही लोकांनी हे ट्विट हे संकेत म्हणून घेतले की, Shiba Inu आता Dogecoin पासून वेगळे होत आहेत. अधिकृत वेबसाइटनुसार, Shiba Inu ची एक वेगळी कम्युनिटी बिल्ड होते आहे, ज्यामुळे त्याला गती मिळाली आहे.

सोमवार आणि मंगळवार दरम्यान Shiba Inu 49% वर चढला. मात्र असे असूनही, त्याचे मूल्य खूप कमी आहे. Coinbase.com नुसार, Shiba Inu ने गेल्या वर्षात 8000% चढाई केली आहे. बिटकॉईन सर्वात जुनी क्रिप्टोकरन्सी आहे आणि कमी अस्थिरता आहे. मात्र Shiba Inu मध्ये खूप चढ -उतार आहेत. या वाढीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे एलन मस्क इफेक्ट. त्यांच्या प्रत्येक ट्विटनंतर Shiba Inu मध्ये वाढ होते.

Leave a Comment