Shikhar Dhawan Announces Retirement : शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार खेळाडू आणि सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती (Shikhar Dhawan Announces Retirement) घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत धवनने निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र आयपीएल निवृत्ती बाबत त्याने कोणतेच भाष्य केलेलं नाही, त्यामुळे तो आयपीएल खेळू शकतो असं बोललं जातंय. मागील काही वर्षांपासून शिखर धवन दुखापतीमुळे भारतीय संघाच्या बाहेर होता, अखेर आज त्याने निवृत्ती जाहीर करून आपल्या चाहत्याना धक्का दिला.

काय म्हणाला गब्बर – Shikhar Dhawan Announces Retirement

एक पोस्ट करत शेखरने आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यात तो म्हणाला मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत आहे, मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जात आहे. आज मी अशा वळणावर उभा आहे. जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला फक्त आठवणी दिसतात, आणि जेव्हा तुम्ही पुढे पाहता तेव्हा तुम्हाला संपूर्ण जग पाहता येते… माझे नेहमी एकच ध्येय होते, भारतासाठी खेळणे.ते ध्येय पूर्ण झालं, यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. सर्व प्रथम माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी…मदन शर्मा जी, ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेट शिकलो. ९Shikhar Dhawan Announces Retirement)

शिखर धवन पुढे म्हणाला, टीम इंडिया कडून खेळल्यानंतर मला चाहत्यांचे प्रेम मिळाले. मला आनंद आहे कि मी भारताकडून मनसोक्त क्रिकेट खेळलो. ज्यांनी मला संधी दिली त्या बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ) आणि डीडीसीए (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन) यांचा मी खूप आभारी आहे. मी स्वतःला तेच सांगतो की तू इथून पुढे देशासाठी खेळणार नाहीस याचं दु:ख मानू ऊ नकोस, पण तू देशासाठी खेळलास तो आनंद कायम ठेव आणि हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्ही मला जे प्रेम आणि समर्थन दिले त्याबद्दल धन्यवाद! जय हिंद…असं म्हणत शिखर धवनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिखर धवन हा भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. रोहित शर्मासोबत त्याची सलामी चांगलीच जमायची…. एका बाजूला शिखर पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर हल्ला करायचा, त्यामुळे दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या रोहितला अतिरिक्त वेळ घ्यायला मिळत होता. शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडगोळीने २०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. शिखरने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय तसेच 68 सामने खेळलेले आहेत.