कोरोना प्यार है..! शिल्पा करतेय कोव्हीड पॉझिटिव्ह पतीसोबत सेफ्टी रोमान्स

Shilpa Shetty- kundra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यात तिची लहान मुलगी समीशा सह पती राज कुंद्रा, सासू-सासरे, शिवाय मुलगा वियान या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: शिल्पाने सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. आता शिल्पा राज कुंद्रासोबतचा अर्थात तिच्या पती सोबतच एक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो प्रचंड वायरल होतोय. या फोटोत शिल्पा व राज दोघेही दिसत आहेत. पण मध्ये काचेची भींत आहे. कारण, राज अद्याप आयसोलेशनमध्ये आहे. साहजिकच शिल्पा व त्याची समोरासमोर भेट होत नाहीये. पण काचेआडून का होईना, त्यांचे प्रेम बहरताना दिसतेय.

https://www.instagram.com/p/CO7MvxmBCHk/?utm_source=ig_web_copy_link

हा फोटो शेअर करताना शिल्पाने सुंदर कॅप्शनही दिले आहे. कोरोना काळात प्रेम, हे कोरोना प्रेम आहे, असे तिने लिहिले आहे. शिवाय शुभेच्छा व प्रार्थनांसाठी सर्व चाहत्यांचे तिने मनापासून आभारही मानले आहेत. या कॅप्शनमध्ये शिल्पाने #Nearlydone असा हॅशटॅग दिला आहे. याचा अर्थ राज कुंद्रा याची प्रकृती आता जवळपास ठीक झाली आहे. त्याचा क्वारंटाईन असण्याचा कालावधी आता लवकरच संपणार आहे. म्हणजे काय तर शिल्पा लवकरच तिच्या हबी ला प्रत्यक्षत भेटू शकणार आहे.

https://www.instagram.com/p/CH4Fgr0Kyiw/?utm_source=ig_web_copy_link

राज आणि शिल्पा यांची एका परफ्यूमच्या प्रमोशनवेळी एकमेकांशी भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे बिझनेस पार्टनर बनले. मग काय? शिल्पा आणि राजच्या प्रेमकथेची चर्चा मीडियात जोरदार सुरू झाली होती. राज विवाहित होता. पण राजने पत्नी कविताला घटस्फोटाची नोटिस दिली होती. राज आणि कविता यांचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच महिन्यात शिल्पा आणि राज यांनी लग्न केले. हि अशी सुरु झालेली यांची प्रेम कहाणी लग्न नंतर दोन गोड मुलांसह सुफळ झाली आणि अजूनही तितक्याच गोडव्यानिशी कायम आहे.

https://www.instagram.com/p/CM6Vvg9hYJP/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ‘बाजीगर’ या चित्रपटामुले चर्चेत आली आणि अभिनय क्षेत्रात सुद्धा. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्व स्तरांवर कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक जबरदस्त हिट चित्रपट दिले. धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये शिल्पाने अव्वल भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील राज्य केले आहे. सुपर डान्सर या डान्स रिऍलिटी शो मध्ये ती जज असतानाची सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. एकंदर काय तर शिल्पाचा ट्रेंड आजही कायम आहे.