शिंदे- फडणवीस सरकारने 100 दिवसांत 700 शासन निर्णय काढले : आ. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी जिरायती क्षेत्रासाठी साडेतेरा हजार रुपये आणि बागायतीसाठी साडेसव्वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीची दोन हेक्टरपर्यंत मुदत तीन हेक्टरपर्यंत वाढवली आहे. शंभर दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारने जनकल्याणाचे 700 शासन निर्णय काढले, असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या शंभर दिवसांत राज्यासाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती मंत्री देसाई यांनी आज पत्रकारांना दिली. ते म्हणाले,” नियमितपणे कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील तीन लाख 85 हजार 101 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्या माध्यमातून त्यांना 880 कोटींची मदत झाली आहे. कोयनानगरला एनडीआरएफच्या धरतीवर पोलिस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी महसूलची जागा उपलब्ध असून, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. याशिवाय जिल्ह्यात सर्व सुविधांनीयुक्त अशी 15 मॉडेल स्कूल आणि 17 प्राथमिक आरोग्य केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यासाठी शासन, डीपीसीतून निधी देणार आहोत.

शासकीय मेडिलक काॅलेजचे काम पाडण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही
सातारा शासकीय मेडिकल कॉलेज जिल्ह्यासाठी महत्त्‍वाचे असून, त्याचे काम कधीही बंद पडू दिले जाणार नाही. जलसंपदाच्या करार तत्त्‍वावरील जागेत राहणारे गाळेधारक आणि कुटुंबीय यांच्याशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढला जाईल. त्यानंतरही जर कोणी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.