हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज दिल्लीमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात दिल्लीतील बी डी मार्गावर झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणाला देखील दुखापत झालेली नाही. तसेच हेमंत गोडसे देखील सुखरूप आहेत. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. यात हा अपघात कसा झाला याचे कारण समोर आलेले नाही. त्यामुळे याचा शोध घेतला जात आहे.
अपघात कसा घडला?
आज सरकारी कामानिमित्त हेमंत गोडसे दिल्लीला येत होते. याचवेळी बी डी मार्गावर येताच त्यांच्या इनोव्हा MH 15 FC 9909 या कारला आर्टिका डीएल 7CW 2202 ने जोरात धडक दिली. ही धडक कारला एवढी जोरात बसली की, त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने कोणाला देखील दुखापत झाली नाही. या अपघातात गोडसे आणि त्यांचे कार्यकर्ते सुरक्षित बचावले आहेत. परंतु त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. आता पोलिसांनी गोडसे यांच्या कारला धडक देणाऱ्या कारमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेमंत गोडसे कोण आहेत?
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटांच्या शिवसेनेतून येतात. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून केली होती. त्यांनी 2007 ते 2012 पर्यंतजिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2012 साली त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत विजयी होऊन राजकारणात प्रवेश केला. 2009 साली त्यांनी मनसेतर्फे पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढली. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शेवटी 2014 साली ते खासदार म्हणून निवडून आले.