शिवसेना बाळासाहेब!! शिंदे गटाचे नाव ठरलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या तब्बल 40 समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंड पुकारल्या नंतर आता एक मोठी घोषणा केली आहे. शिंदे गटाने आपल नाव शिवसेना बाळासाहेब गट अस ठेवलं आहे. गुवाहाटी येथील बैठकीत हे नाव निश्चित झालं असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल.

शिंदे गटाने आपल्या नावात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा उल्लेख केल्याने शिवसैनिक संतप्त होण्याची शक्यता आहे. तसेच या नावावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यानंतर यापुढील लढाई कोर्टात होऊ शकते. शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब अस नाव आपल्या गटाला दिल्याने शिवसैनिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच बंडखोर आमदारांना इशारा देत हिंमत असेल तर शिवसेना आणि ठाकरे नाव वगळून जगून दाखवा अस आव्हान दिले होते. त्यानंतरही आज शिंदे गटाने आपल्या गटाला बाळासाहेबांचे नाव दिले आहे.