काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला; व्यंगचित्रावरून रंगला सामना

0
1
sharad pawar uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तस राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैलीही वाढतच आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ गट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत असल्याने विरोधक त्यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून निशाणा साधतच असतात. आजकाल व्यंगचित्रातून टोमणे- ताशेरे ओढणे सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुये. शिवसेना शिंदे गटाचे व्यंगचित्राच्या रूपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला या मथळ्याखाली या टोला ठाकरेंना लगावण्यात आलाय.

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मानाचे स्थान मिळत नाही, काँग्रेस- राष्ट्रवादीकडून त्यांची मुस्कटदाबी होते अशी टीका भाजप आणि शिंदे गट सातत्याने करत असतो. त्यातच उद्धव ठाकरे हे ३ दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर गेल्यानंतर विरोधकांची टीकेची धार आणखी वाढली. गांधी घराणे आणि शरद पवार यांच्यासमोर ठाकरेंचं काही चालत नाही असा आरोपही विरोधकांनी यापूर्वी केलाय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे व्यंगचित्र काढत टोला लगावला आहे.

काय आहे व्यंगचित्रात ?

शिवसेनेच्या ट्वीटर हँडलवरुन जे ट्वीट करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. हे पुंगी वाजवताना दिसत आहे. तर त्यांच्या तालावर संजय राऊत उद्धव ठाकरे, आणि आदित्य ठाकरे हे डोलत असल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे. संजय राऊत हे तर पुंगीवरच गुडघे टेकून बसल्याचे यात दिसतंय. जर आपण बारकाईने पाहिले तर या चित्रात मशाल हे उद्धव ठाकरे यांचे चिन्हं विझल्याचे आणि त्यातून आता केवळ धूर येत असल्याचा मार्मिक चिमटा या व्यंगचित्राच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला असं म्हणत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.