हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shinde Group Vs Bjp। भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून वादाची ठिणगी आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात पक्षप्रवेश दिला जात असल्याने शिंदे गटातील नेते अस्वस्थ आणि नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. वर वर जरी दोन्ही बाजूनी नाराजी नसल्याचे सांगण्यात येत असलं तरी नक्कीच महायुतीत काहीतरी घोळ असल्याचे वारंवार समोर आलं आहे. आता तर एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने भाजपला इशारा देताना थेट स्वतंत्र लढण्याची भाषा वापरली आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटते कि काय या चर्चांना बळ मिळताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं? Shinde Group Vs Bjp
काल म्हणजेच 3 नोव्हेंबरला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. डोंबिवलीतील दोन बडे नेते सदानंद थरवळांचा मुलगा अभिजीत थरवळ तसेच कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटातील नेत्यांना फोडायची हि काय पहिलीच वेळ नव्हती, मात्र यावेळी वरून आदेश येऊनही भाजपने शिंदे गटाला खिंडार पाडण्याचे काम केल्याने शिंदेची शिवसेना चवताळून उठली. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी भाजपला युती तोडण्याचा इशारा दिला. लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असा इशारा संजय शिरसाठ यांनी दिला. Shinde Group Vs Bjp
संजय शिरसाठ काय म्हणाले?
रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्र बघावा. डोंबिवली-कल्याण कशाला बघता. त्यांनी आमच्या कार्यकर्त्याना त्रास दिला, मग आम्हाला उत्तर द्यावंच लागेल, मग तुमच्या अॅक्शनला आमच्याकडून रिअॅक्शन येणारच. तसेच अशापद्धतीने फाटाफूट झाली तर मग भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील. लोकांना महायुती हवी आहे हे खार आहे, पण तुम्ही फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असा इशारा देखील संजय शिरसाट यांनी दिला. संजय शिरसाठ यांच्या या निर्वाणीच्या इशाऱ्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येतेय ते बघाव लागेल.




