सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
उध्दव ठाकरे यांच्या गटातील पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नाव असलेले नितिन बानगुडे- पाटील यांच्या गावातच शिंदे गटाने (शिवसेना) झटका दिला आहे. कराड तालुक्यातील बानुगडेवाडी येथे आजपर्यंत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची शाखा नाही. परंतु शिंदे गटाच्या शिवसेनेची शाखा उघडत उघडपणे आव्हान दिले आहे. तर यावेळी शिवव्याख्याते आणि शिवसेना नेते नितीन बानगुडे- पाटील यांच्यावर जहरी टीका केली.
या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, युवा जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शरद कणसे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. जिल्हावासियांनी मुख्यमंत्र्यांना भरभरून प्रेम दिले आहे. पालकमंत्री यांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री यांच्या सहकार्यातून कोट्यावधीची कामे करायची आहेत.
रणजीत भोसले म्हणाले, लोकांनी मोठ्या उत्साहात आमचे स्वागत केले आहे. नितीन बानुगडे- पाटील हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आज तरूणांसह वृध्द आजच्या शाखेच्या उद्घटनाला आले आहेत. कारण वैयक्तिक विकास होण्यापेक्षा गावचा विकास होणे गरजेचे आहे. परंतु आजपर्यंत वैयक्तिक विकास झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बानुगडेवाडी येथील गावकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील.