Tuesday, February 7, 2023

चांदणी चौकातील पूल आज मध्यरात्री पाडणार; परिसरात कलम 144 लागू

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातील पूल आज मध्यरात्री २ वाजता पाडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चांदणी चौक परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. अवघ्या ५ सेकंदात हा पूल जमीनदोस्त होईल

चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. यासाठी तब्बल 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. नोएडाच्या ट्विन टॉवर पाडणाऱ्या कंपनीला पुण्यातील हा पूल पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार फक्त ५ सेकंदात हा पूल जमीनदोस्त होईल. यानंतर तातडीने ढिगारा साफ करण्याचे काम सुरू होईल. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे चांदणी चौकातील पूल चर्चेत आहे.

- Advertisement -

पूल पाडताना शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत या परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. छोट्या चारचाकी वाहनांसाठी पोलीस प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली असून ट्रक आणि अन्य जड वाहने पूर्णपणे बंद राहणार आहेत. लवकरात लवकर हा पूल पाडून नागरिकांची गैरसोय होणार नाही असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यानंतर सकाळी लवकरात लवकर या रस्त्यावरील वाहतूक आधीप्रमाणे पूर्ववत केली जाईल.