हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के दिले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीत आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.
आमच्याकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. 50 आमदार आणि 12 खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे सुद्धा पाहावं लागेल.
दरम्यान, आमदारांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेचे लोकसभेतील तब्बल 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली आहे. तसेच अनेक शहरातील नगरसेवक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत.