बार्ज पी 305 जहाज : साताऱ्यातील अभियंत्यांचा मृतदेह डीएनए चाचणी केल्याने सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | तौक्ते चक्रीवादळात बार्ज पी 305 जहाजातून बेपत्ता झालेले जावली तालुक्यातील गवडी गावचे सुपुत्र वरिष्ठ अभियंता सचिन जगन्नाथ पाटणे यांच्या मृतदेहाची ओळख पटली. नाैदलाला जे मृतदेह सापडले होते, त्यांची ओळख पटवणे मुश्किल पटवणे मुश्किल झाल्याने सचिन पाटणे यांची डीएनए चाचणी करूनच ओळख पटवण्यात आली. काल जन्मगावी गवडी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तौक्ते चक्रीवादळात मुंबईजवळ अरबी समुद्रात बार्ज पी 305 जहाजातून बेपत्ता झालेल्या सचिन पाटणे यांच्या कुटुंबीयांनी जिल्ह्यातील खासदारांना सचिनच्या शोधकार्यात लक्ष घालण्याचे आवाहन केल्यानंतर खा. श्रीनिवास पाटील व खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी याचा पाठपुरावा करून सचिनचा मृतदेह मिळण्यासाठी प्रयत्न केले.

सचिन पाटणे हे कंपनीत २०१५ मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले होते. जानेवारी महिन्यात ते गावाला आले होते. ती कुटुंबाची त्यांची शेवटची भेट ठरली. सचिनचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांच्या अशा बेपत्ता होण्याने पाटणे कुटुंबासहीत गवडी गाव व मित्र परिवार देवाकडे सचिन सुखरूप परत यावा, अशी प्रार्थना करत होता. नाैदलाला जे मृतदेह सापडले होते त्यांची ओळख पटवणे मुश्किल झाले होते. त्यांची डीएनए चाचणी करूनच ओळख पटवली जात होती. सचिन पाटणे यांचीही डीएनए चाचणी करूनच ओळख पटवण्यात आली.