Shirdi Railway : साईभक्तांना आनंदाची बातमी!! शिर्डी रेल्वे मार्गासाठी 239.80 कोटी मंजूर

Shirdi Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shirdi Railway । शिर्डीला साईबाबांचे दर्शन घ्यायला जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने १६.५ किलोमीटर लांबीच्या पुणतांबा-साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे, या प्रकल्पाचा अंदाजे खर्च २३९.८० कोटी रुपये असून हा प्रकल्प २०२४-२५ च्या अम्ब्रेला वर्क फॉर मल्टी-ट्रॅकिंगचा एक भाग असणार आहे. शिर्डीतील पायाभूत सुविधांना चालना देणे आणि शिर्डी सारख्या प्रमुख विभागांमध्ये रेल्वे क्षमता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

भाविकांसह, शेतकरी विद्यार्थ्याना फायदा – Shirdi Railway

पुणतांबा-साईनगर शिर्डी रेल्वेमार्ग (Shirdi Railway) सध्या १९.६६% लाईन क्षमतेने कार्यरत आहे. मात्र, भविष्यात दुहेरीकरणाशिवाय वापर क्षमता ७९.७०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मार्गावर ताण वाढू शकतो. पुणतांबा आणि साईनगर शिर्डी हे दोन्ही शहर आधीच रेल्वे मार्गाने जोडले गेले असून या मार्गावर अनेक ट्रेन धावत आहेत. त्यामुळे पुणतांबा-साईनगर शिर्डी मार्गावरील वाढती गर्दी कमी करावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच प्रस्तावित दुपदरीकरण करण्यात येणार आहे. पुणतांबा-साईनगर शिर्डी मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे भाविक, दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे बाजारपेठेत कृषी उत्पादनांची जलद वाहतूक होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश –

दुसरीकडे, आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा, वेळप्रसंगी जास्तीचे मनुष्यबळ वापरा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.शिर्डी येथील विमानतळावर (Shirdi Airport) नवीन हवाई वाहतूक नियंत्रण इमारत, एकात्मिक मालवाहू इमारत आणि टर्मिनल इमारतीचे काम प्रस्तावित आहे. ही कामे आगामी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करावीत. आवश्यक असल्यास, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा. तसेच, विमानतळासाठी आवश्यक असलेले खरेदी आणि स्ट्रक्चरल डिझाइनचे काम येत्या आठवड्यात पूर्ण करावे असे निर्देश फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे रेल्वे आणि विमानसेवा या दोन्ही वाहतुकीमुळे शिर्डीच्या पर्यटनाला येत्या काळात आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.